Happymarathi
  • Home
  • Quotes
    • Quotes By Author
    • Motivational Quotes
    • Sant Quotes
    • Feelings Quotes
    • Occasion Quotes
    • Culture Quotes
  • Birthday Wishes
Reading: सद्गुरु श्री वामनराव पै यांचे प्रेरणादायी विचार | Wamanrao Pai quotes in Marathi
Share
Notification Show More
Happymarathi
  • Home
  • Quotes
  • Birthday Wishes
Search
  • Home
  • Quotes
    • Quotes By Author
    • Motivational Quotes
    • Sant Quotes
    • Feelings Quotes
    • Occasion Quotes
    • Culture Quotes
  • Birthday Wishes
Follow US
Home » सद्गुरु श्री वामनराव पै यांचे प्रेरणादायी विचार | Wamanrao Pai quotes in Marathi
Quotes By Author

सद्गुरु श्री वामनराव पै यांचे प्रेरणादायी विचार | Wamanrao Pai quotes in Marathi

हॅप्पीमराठी
Last updated: 2022/09/10 at 11:02 AM
हॅप्पीमराठी 4 years ago
Share
7 Min Read
Wamanrao Pai quotes in Marathi

सद्गुरु श्री वामनराव पै एक महान समाजसुधारक, एक प्रसिद्ध तत्त्वज्ञ, आध्यात्मिक नेता आणि नाविन्यपूर्ण जीवनविद्या (जीवनाचे विज्ञान आणि सुसंवादी आणि यशस्वी जीवन जगण्याची कला) तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक – यांचा जन्म मुंबई, भारत येथे 21 ऑक्टोबर 1922 रोजी झाला.

आम्ही ह्या महान व्यकती सद्गुरु श्री वामनराव पै यांचे महान व प्रेरणादायी विचार हॅपीमराठी मधील ह्या लेख मध्ये देत आहोत.

Wamanrao Pai Suvichar in Marathi

सर्व गोष्टी आपल्या मनासारख्याच झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसांच्या सर्व दु:खांना कारणीभूत ठरतो.

वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नांत यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.

नशीब हे आकाशातुन पडत नाही किंवा जमिनीतुन उगवत नाही
नशीब आपोआप निर्माण होत नसते
केवळ माणूसच स्वतःचे नशीब स्वतः च घडवत असतो.

सुंदर विचारांची जोपासना हीच आहे परमेश्वराची उपासना हे सत्य नित्य स्मरणात ठेवून जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे.

निसर्ग नियमांसहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर, व्यवस्था म्हणजे सगुण साकार परमेश्वर.

दिव्य जाणीव, प्रतिभाज्ञान व दिव्य आनंद यांनी युक्त अशी सर्वव्यापी, सर्वसमर्थ, अनंतस्वरुप दिव्य शक्ती म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वर.

देवासकट सर्व काही प्राप्त करुन देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय.

सत्कर्म हाच खरा धर्म व सत्कर्मांचे आचरण करणे हेच आहे धर्माचरण. श्रध्दा पाहिजे सत्कर्मावर आणि सबुरी पाहीजे सत्कर्माचे फळ मिळण्यासाठी.

जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून कोणीही वरिष्ठ नाही व कोणीही कनिष्ठ नाही, आहेत ते सर्व श्रेष्ठ कारण सर्वच असतात आपापल्यापरी उपयुक्त.

नशीबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याचप्रमाणे नशीब घडेल हेच एकमेव सत्य आहे.

Wamanrao Pai quotes in Marathi

परमेश्वर विश्वरुपाने समोर आहे, शरीर रुपाने जवळ आहे व सच्चिदानंद स्वरुपाने तो हृदयात आहे.

“पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’’ हे खरे नाही. जीवनातील 90 टक्के घटना या स्वाधीन असून फक्त 10 टक्के घटना पराधीन असतात.

चातुर्मासांत लोक नानाप्रकारची व्रते करतात परंतु मी कोणाचेही मन दुखविणार नाही असा निश्चय करून ते आचरणांत आणण्याचा प्रयत्न करणे त्यांना कठीण वाटते.

ज्याप्रमाणे साप आपली जुनी कात टाकून नवीन कात धारण करतो, त्याप्रमाणे हे जग जुने रूप टाकून नित्य नवीन रूप धारण करीत असते. म्हणून जग हे नित्यनूतन आहे.

अभ्यासाला पर्याय नाही हे प्रत्येक माणसाने सदैव लक्षात ठेवले पाहिजे अभ्यासामुळे सर्व काही शक्य आहे कारण अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.

माणसाच्या जीवनात जेव्हा इष्ट व चांगले घडते तेव्हा ती ईश्वराची कृपा नसून तो पुण्यप्रभाव असतो, त्याचप्रमाणे त्याच्या जीवनात जेव्हा अनिष्ट किंवा वाईट घडते तेव्हा तो परमेश्वराचा कोप नसून पापाचा प्रताप असतो.

अर्थाशिवाय संसार फाटका तर परमार्थाशिवाय संसार नकटा होय.

तारुण्याच्या मस्तीत तरुणांना परमार्थाची गरज असतानाही तशी गरज भासत नाही आणि उतारवयात जेव्हा गरज वाटते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

साधनेचा दुष्काळ व ज्ञानाचा सुकाळ यामुळेच परमार्थात सर्वत्र गोंधळ झालेला दिसून येतो.

परमेश्वराचे निसर्गनियम व त्यांचे मानवी जीवनावर होणारे बरे‚ वाईट परिणाम लक्षात घेऊन मानवी कल्याणासाठी स्वीकृत केलेली विचारधारणा म्हणजे धर्म.

माणसांतील माणुसकी जागृत करणे हाच आहे खरा धर्म, तेच आहे खरे शिक्षण व तोच आहे मानव जातीच्या सर्व समस्यांवरील खरा रामबाण उपाय.

राष्ट्रशत्रुंचे व समाजकंटकांचे संपूर्ण निर्दळण हाच खरा धर्म, दया व अहिंसा .

आपल्या मुलांना सज्जन लोकांची संगत मिळेल अशी काळजी घेणे हे प्रत्येक पालकाचे मुख्य कर्तक्य आहे.

घरादाराचा त्याग करून ब्रह्मचिंतन करणाऱ्या संन्याशापेक्षा प्रपंचात राहून भगवत् चिंतन करणारा गृहस्थाश्रमी सहस्त्रपटीने श्रेष्ठ होय.

quotes in Marathi

सर्व सुखाचा आराम असा जो ‘हृदयस्थ राम’ त्याचा विसर पडल्यामुळे “रमी, रम व रमा’’ या त्रयींच्या कात्रीत जीव कातरला जात आहे.

देहाच्या कपाटात स्मरण आणि विस्मरण हे दोन खण असतात. संसारातील कुठल्या गोष्टी कुठल्या खणात टाकायच्या यावर संसारातील सुख-दुःख अवलंबून असते.

सुखाला कारण विचार तर दुःखाला कारण अविचार.

विकार ज्यांना आवरता येतात ते मानव, ज्यांना आवरता येत नाहीत ते दानव व ज्यांच्या वृत्तीवर विकार उठतच नाहीत ते देव जाणावेत.

आस्तिक म्हणतो मला गोविंद पाहिजे व नास्तिक म्हणतो मला आनंद पाहिजे; आनंद व गोविंद या दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच व तो म्हणजे ‘स्वानंद’, म्हणून जगात कोणीही नास्तिक नाही.

“प्रारब्धवाद आणि पलायनवाद’’ या राहू‚ केतूचे भारतीय समाजाला लागलेले ग्रहण सुटण्यासाठी प्रयत्नवाद व वास्तववाद यांची कास धरणे आवश्यक आहे.

हिंदुस्थानातील लोकांची तीन दैवते आहेत किंवा असावयास पाहिजेत एक भगवान श्रीकृष्ण, दुसरे आर्य चाणक्य व तिसरे छत्रपती शिवाजी महाराज.

मूर्ख माणसे मेल्यानंतर स्वर्गाला जाण्याची वाट पहातात तर सूज्ञ माणसे या पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

भूतकाळाचे चिंतन व भविष्यकाळाची चिंता या दोन्ही बाजूस सारून जो केवळ वर्तमानकाळात स्थिर रहातो तो स्थितप्रज्ञ.

स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्गदेवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला ‘जीवन’ असे म्हणतात.

मानवी जीवनाचे अधिष्ठान आहे परमेश्वर, प्रतिष्ठान आहे शरीर व जीवन जगणे, हे आहे त्याचे अनुष्ठान.

स्वतचा अहंकार चेपणे व दुसऱयाचा अहंकार जपणे ही आहे सुखी व यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली.

आपली गृहलक्ष्मी ही ऐश्वर्यलक्ष्मीला आमंत्रण देणारी महालक्ष्मी होय.

‘विश्वप्रार्थना’ हा सर्व चिंता नाश करणारा चिंतामणी, सर्व कामना फलद्रूप करणारी कामधेनू, सर्व संकल्पसिद्ध करणारा कल्पतरु व जीवनाचे सोने करणारा परीस आहे.

जी व्यक्ती माणुसकीने वागते, ती देवाची खरी भक्त असते आणि माणूस म्हणून लायक असते.

सुंदर विचारांची जोपासना हे सत्य नित्य स्मरणात ठेवून जीवन जगणे हे खरे शहाणपण आहे.

वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.

भ्रमाला आलेला प्रत्यक्ष आकार म्हणजे अहंकार.

पैसा कमवणे हे जितके महत्त्वाचे
आहे त्याहुनही कितीतरी अधिक
महत्वाचे आहे माणसे जोडणे
मग ती घरातील असोत की
घराबाहेरची, या सत्याची जाणीव
होण्यात खरे शहाणपण आहे.

जीवनविद्या राष्ट्राच्या अपेक्षेत फक्त दोनच जाती मानते त्या म्हणजे राष्ट्रभक्त व राष्ट्रद्रोही आणि विश्वाच्या अपेक्षेत जीवनविद्येला सज्जन व दुर्जन अशा दोनच जाती मान्य आहेत.

जी माणसे दुसऱ्यांची निंदानालस्ती करण्यात सदैव आघाडीवर असतात ती अक्कलशून्य असतात कारण ‘निंदा करणे’ ही एकच गोष्ट अशी आहे की त्यासाठी अक्कल लागत नाही.

शहाणपण (Wisdom)ही एकाच गोष्ट अशी आहे ज्यात समाजाची सुरेख धारणा करण्याचे अतुल सामर्थ्य आहे.

आपल्या दुःखाला कारण देव किंवा दैव
नसून आपणच असतो अशी ज्याची
धारणा असते तोच प्रगतीच्या मार्गाला लागतो
अंधश्रध्येच्या आहारी जो माणूस जातो
त्याची अधोगती झाल्यावाचून राहत नाही.

योग्य पद्धतीने शरीराची जोपासना कराल तर ते शरीर साक्षात परमेश्वर ,परंतु व्यसनांच्या आहारी गेलात तर तेच शरीर सैतानाचे रूप घेते.

Arya Chankya quotes in Marathi
हॅप्पीमराठी September 10, 2022 November 8, 2021
Share this Article
Facebook Twitter Email Copy Link Print
By हॅप्पीमराठी
Follow:
संपादक मंडळ , हॅप्पीमराठी डॉट कॉम
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित पोस्ट

Arya Chanakya quotes in Marathi
Quotes By Author

योग्य मार्ग दाखवणारे आचार्य चाणक्य यांचे अनमोल विचार | Arya Chanakya quotes in Marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Swami Vivekananda quotes in Marathi
Quotes By Author

स्वामी विवेकानंदांचे अमूल्य विचार तरुणांसाठी जीवनमंत्र आहेत | Swami Vivekananda quotes in Marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
V.P. kale quotes in Marathi
Quotes By Author

लेखक व. पु. काळे यांचे आयुष्याला प्रेरित करणारे विचार | V.P. kale quotes in Marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Napoleon Bonaparte quotes in Marathi
Quotes By Author

सर्वात उल्लेखनीय नेपोलियन बोनापार्ट यांचे अनमोल विचार | Napoleon Bonaparte quotes in Marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Follow US

Copyright © 2022 HappyMarathi.com

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms And Conditions
  • DMCA Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?