व. पु. काळे (V.P Kale) म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे. यांचा जन्म 25 मार्च 1932 साली झाला तर 26 जून 2001 रोजी मुंबईतील त्यांच्या घरी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. साहित्यीक लेखक, कादंबरीकार, कथाकथन अशी प्रचिती असलेले व. पु. काळे हे व्यवसायाने आर्किटेक्ट होते.
मराठी साहित्यीक विश्वावर अधिराज्य गाजवणारे अनेक पुरस्कारांचे धनी असलेले व. पु. काळे यांच्या लिहण्याला तोड नव्हती, त्यांनी 60 हून अधिक पुस्तके लिहिली. पार्टनर, वपुर्झा, हाय वाट एकतीची आणि ठिकरी तसेच सखी, तप्तपदी, रस्त्यासाठी एक ही त्यांची सुप्रसिद्ध पुस्तके आहेत. ते एक प्रसिद्ध कथाकार होते आणि थिएटरमध्ये त्यांचे 1600 हून अधिक स्टेज-शो होते. ऑडिओ कॅसेटच्या स्वरूपात येणारे ते पहिले लेखक होते.
जरी आज व. पु. काळे हयात नसले तरीही त्यांचे साहित्य वर्षों वर्ष रसिकांच्या मनावर कायम अजरामर राहिल. म्हणूनच आज आम्ही त्यांचे निवडक प्रेरणादायी व अनमोल विचार हॅपीमराठी मधील ह्या लेख मध्ये देत आहोत.
V.P. kale quotes on life in Marathi
आयुष्यात एक वेळ अशी येते की, जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते.
मनस्ताप ही अवस्था अटळ आहे. पण आपणच संघर्ष टाळू शकलो तर तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे दोन्ही तुकडे जागच्या जागी राहतात. त्यातून पाणी पिता आलं नाही तर त्यात फुलं ठेवता येतात.
आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही. आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हे. ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं. वाट आणि उतार गवसेल तसं.
तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा अनुभव हाच तुमचा गुरू. कारण प्रचीतीचं झगझगीत तेजोवलय पाठीशी उभं असतं.
प्रगतीचा रस्ता कोणत्याही दिशेने जाणारा असो त्याचं प्रस्थान मनातच हवं.
अनेक समस्या त्याक्षणी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्यात थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा.
तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात. मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो.
छान राहायचं हसायचं ! पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच ना.
V.P. kale quotes on life in Marathi
प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, तर कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टी शिवाय प्रॉब्लेम कधी अस्तित्वाच नसतो.
सगळे कागद सारखेच, त्याला अहंकार चिकटला की, त्यांचे सर्टिफिकेट होतं.
आपलं काहीच चुकलेलं नाही ही भावनाच माणसाला नव्या क्षणाचं स्वागत करायला बळ देते.
काळ फक्त माणसाचं वय वाढवतो, आठवणींंना वार्धक्याचा शाप नसतो.
आयुष्यातला सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतंं ते साध्य करून दाखवणं.
निष्क्रिय आणि अहंकारी माणसं शेवटी एकटीच पडतात.
आपण आपल्या आयुष्यात खूप काही मिळवतो पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड आपण करतो ते कारणच बऱ्याचदा आपल्याबरोबर राहात नाही. मग राहून राहून मनात येतं, काही नव्हतं तेव्हाच आपण सुखी होतो.
चालताना विचाराला आणि विचारामुळे चालण्यास गती मिळते.
ज्याच्याशी लढायचंय त्याचा पूर्ण परिचय असावा, हा युद्धाचा पहिला नियम आहे.
V.P. kale quotes on love and status in Marathi
प्रेमाच्या प्रांतात स्वतःकडे कमीपणा घ्यायची वृत्ती लागते. स्वतःला लहान समजण्यातलं मोठेपण मिळवायचं असतं.
जेवढं घट्ट नातं तेव्हढे तीव्र मानपान, परक्या माणासाला आपलं प्रेमही देणं लागत तसंच रागही…
मन मारून मिठीत जाण्यापेक्षा मन मोकळे करायला मिळालेली कुशी सुरक्षित.
ज्याच्याजवळ सावरण्याची शक्ती आहे तो कुणाला आवरत बसत नाही.
पुरूषांना पण व्यथा असतात. पण त्यांच्यावर उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती कायम त्यांना हवी असते. उडून जाणारं अत्तर त्यांना आवडत नाही.
ड्रिंक्स असाततच पण नशा असते ती सहवासाची आणि किक चढते ती गप्पांची!
काही वेळा मानलेल्या नात्यात प्रेम सापडतं. पण सख्या नात्यात ओढा आढळत नाही.
मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं. एका वेळेला एकच साधता येतं. स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचं मन.
V.P. kale quotes on love and status in Marathi
बोलणी फिसकटली की, मोडतो तो व्यवहार, प्रेम नव्हे!
प्रेम हे आपोआप घडतं, घडवून आणता येत नाही.
स्वतःवरच तुफान प्रेम करणाऱ्या माणसाला शत्रू नसतात.
उदंड प्रेम करावं आणि दुसऱ्यावर प्रचंड विश्वास ठेवावा. चांगुलपणाने वागण्यात स्पर्धा कमी असते त्यामुळे त्या मार्गाने जावं.
प्रेम केल्यानेच प्रेम समजतं.
प्रेम हाही एक तऱ्हेचा वातच आहे. वात झालेला माणूस दहा दहा माणसांना आवरत नाही. प्रेमात पडलेला माणूसही अनावर असतो.
ज्याला प्रेम समजतो, शब्द समजतो तो वेळ पाळतो, नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो, तो वेळ साधतो.
त्याग हाच प्रेमाचा पाया आहे हे ज्यांनी ज्यांनी जाणलं त्यांना प्रेम शब्दातूनच व्यक्त करण्याची पाळी येत नाही. त्यांची प्रेमाची यात्रा निःशब्द असते. मौन हाच त्यांचा गाभा असतो.
जोडीदाराशी संंवाद न होणं यासारखं नरक नाही.
रोज रोज प्रेम करतो म्हणजे प्रेम नसते… तर आपल्या आयुष्यात कोणीतरी अशी व्यक्ती असणे जिच्यावर आपला इतका विश्वास असतो की आपण त्यांना कितीही दूर केलेत तरी, त्यांचे मन कितीही दुखावलेत तरीही ते तुमची साथ सोडणार नाहीत. ते केवळ तुमचेच होते, तुमचेच आहेत आणि तुमचेच राहतील.
V.P. kale vinodi quotes in Marathi
एकत्र राहण्यासाठी अक्षता लागत नाहीत तर अंडरस्टँडिंग लागतं.
प्रतिसाद देणारं मन साद देणाऱ्या मनाइतकं विशाल असतं.
ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.
पापणीच्या आत झालेली पुटकुळी फक्त डोळ्यांंना समजते, म्हणून कोणी डोळा फोडतो काय?
सुंदर मुलीसाठी झुरायला फार अक्कल लागत नाही.
कबुतराला गरूडाचे पंख लावता येतील पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
व्यवहारापलीकडे जगात खूप आनंद आहेत, या पैशात मांडता न येणारे.
पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते हा बायकांचा चुकीचा समज आहे. आकर्षण आणि प्रेम या फार वेगवेगळ्या अवस्था आहेत.
Identity Cards सारखी विनोदी गोष्ट या जगात दुसरी काही नसेल. आपण आहोत कसे हे त्यांना हवं असतं. त्याऐवजी आपण दिसतो कसे ते पाहून ते ओळखतात.
कौतुकाला थोडी हेव्याची किनार असल्याशिवाय त्याला खरी खुमारी येत नाही.
V.P. kale vinodi quotes in Marathi
संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की, माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करत नाही.
माणूस निराळा वागतोय तो कामातून गेला असं आपण पटकन बोलतो. पण तसं नसतं या सगळ्याचा अर्थ तो फक्त आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो.
विरोधक एक असा गुरू आहे जो तुमच्यातील कमतरता परिणामांसह दाखवून देतो.
एखादी वस्तू मनात कोणताही संभ्रम निर्माण न करता आवडते तेव्हाच ती स्वीकार करण्यायोग्य मानावी. ती वस्तू म्हणजे एखादा विचारही असेल.
स्टोव्हची जातच लहरी पुरूषाप्रमाणे. शेगड्या बिचाऱ्या गरीब असतात. एव्हर रेडी! स्टोव्हचं तसं नाही. त्याची मिजास सांभाळली तरच पेटणार.
बायकोपेक्षा मैत्रीण जास्त विश्वास ठेवते म्हणून क्षमा करण्याची ताकद बायकोपेक्षा मैत्रिणीत जास्त असते.
तासनतास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं यासारख्या यातना नाहीत. पण कुणीतरी आपली वाट पाहत आहे या जाणीवेसारखं दुसरं सुखही नाही. या जाणीवेतूनच माणसं धावत्या गाड्या पकडतात.
आयुष्यात समंजस जोडीदार आणि गुणी संतती लाभली की धकाधकीची वाटचाल ही सरळ वाटते. निखारे सौम्य होतात. काट्यांची टोकं बोथट होतात आणि सारं सोपं सोपं होऊन जातं.
प्रतिसाद देणारं मन साद देणाऱ्या मनाइतकं विशाल असतं.
V.P. kale vinodi quotes in Marathi
विचारा इतकं देखणं दुसरं काहीही नाही.
सतत वाहतं राहिलं की जवळ काही उरत नाही.
काही काहींना खुद्द स्वतःच्या मनाचीच मागणी कळत नाही.
स्वतःचं स्वतःचं घर सांभाळायचं हे मला गोगलगाईने सांगितलं.
संसार ही एक जबाबदारी असते त्याचं ओझं वाटायला लागलं की गंमत गेली.
स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस हा स्वतःच एक खणखणीत नाणं असतो.
प्रेम केल्यानेच प्रेम समजतं.
भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात हेच खरं.
आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असणार ही आशा सुटत नाही. म्हणूनच आपण जगतो.
V.P. kale Suvichar in Marathi
आठवणी खरंच चांदण्यांसारख्या असतात कोणती कधी लुकलुकेल सांगता येत नाही.
ऐश्वर्य आणि सौंदर्य यांना मदत करायला सगळेच झटत असतात.
डोळे असणाऱ्या माणसाला दुसऱ्याचं सुख बघवत नाही. पाप नजरेत असत असं म्हणतात ते उगीच नाही.
एखादा फुगा फुगवता फुगवता एखाद्या क्षणी फुटतो, तो फुटल्यावर समजतं की किती फुगवायला हवा होता.
कोण कुणाला शोभतं आणि शोभेल याचा माणूस फार विचार करतो.
खर्च झाल्याचं दुःख नाही हिशेब लागला नाही की, त्रास होतो.
जखम करणारा विसरतो, पण ज्याला जखम झाली आहे तो मात्र विसरत नाही.
कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं, कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रूंदावत जातो.
बऱ्याचदा विसरायचं म्हटलं की, सगळंच आठवतं.