स्वामी विवेकानंद हे भारतातील अनेक महान विचारवंतांपैकी एक आहेत. स्वामी विवेकानंद हे वेद आणि उपनिषदांचे उत्तम जाणकार होते. त्यांनी वेदांतील तत्त्वज्ञान जगभर पसरवले. तसेच सनातन धर्म आणि संस्कृतीच्या प्रचारात महत्त्वाचे योगदान देऊन संपूर्ण जगाला सनातन धर्म आणि संस्कृतीची ओळख करून दिली.
स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या आधुनिक युगात प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांची प्रभावी भाषणे निराशेने भरलेल्या जीवनात आशेचा किरण दाखवतात. आजही त्यांनी दिलेली प्रेरणादायी प्रवचने आपल्याला जीवनात पुढे जाण्यास आणि जीवनात यश मिळविण्यास मदत करतात.
स्वामी विवेकानंद यांच्या कर्मयोग, राजयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग अशा अनेक पुस्तकांतील विचार आजही तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. आणि कायम राहतील. त्यांच्या मते तरुणांच्या ऊर्जेला योग्य दिशा दिल्यास राष्ट्राच्या विकासाला एका नव्या वळणावर नेता येईल. हैप्पी मराठीवरील या आर्टिकल मध्ये स्वामी विवेकानंदयांचे प्रेरणादायी अनमोल विचार तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरतील. आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या विद्यार्थीयांना शेयर करण्याकरीता उपयोगी ठरतील.
Swami Vivekananda quotes in Marathi
समजदार व्यक्ती सोबत काही काळच केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते.
जीवनात कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात मिळाली की, ती विष बनते मग तो पैसा असो की ताकद.
शक्यतेची सीमा जाणून घेण्याचासाठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवे.
स्वतःला परिस्तिथीचे गुलाम समजु नका तुम्ही स्वतः चे भाग्यविधाते आहात.
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसायला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो.
जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही.
सतत चांगला विचार करत राहा वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे.
स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच ज्ञानाची पाहिली पायरी आहे.
उठा जागे व्हा ! आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचे ध्येय मिळत नाही.
जे दुसऱ्यांसाठी जगतात खऱ्या अर्थाने तेच जिवंत असतात बाकी जिवंत असूनही मेल्यासारखे होत.
कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात यश त्यांनाच मिळते.
आपण जसे विचार करतो तसेच बनतो त्यामुळे आपण काय विचार करतो हे नेहमी लक्षात असले पाहिजे.
अस्तित्वात या! जागृत व्हा, ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका.
काहीही करा पण गुणवत्ता पूर्ण करा, ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव ओता, त्यात सर्वोच्च स्थानी पोहचा.
Swami Vivekananda status in Marathi
एक काम करताना एकच काम करा आपले सर्वस्व त्यात अर्पण करा इतर सगळं विसरून जा.
जितका संघर्ष मोठा तितकच यश मोठं.
आपल्याकडे आधीपासूनच विश्वाच्या सर्व शक्ती आहेत, तरी लोक डोळ्यावर हाथ ठेवतात आणि मग आयुष्यात किती गडद अंधार आहे याबद्दल ओरड करतात.
तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजाल तर दुर्बल बनाल आणि सामर्थ्यवान समजाल तर सामर्थ्यशाली बनाल.
सत्याला हजारवेळा सांगितलं तरीही सत्य सत्यच असत.
उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका.
स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे.
हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं.
अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.
महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.
एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा.
सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये.
बाह्य स्वभाव हा अंतर्गत स्वभावाचं मोठं रूप आहे.
शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.
स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील.
Swami Vivekananda Suvichar in Marathi
आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे.
चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही.
घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
विचार करा, काळजी करू नका, नवीन कल्पनांना जन्म द्या.
कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा.
कोणीही तुम्हाला शिकवत नाही किंवा तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही. तुमचा स्वतः चा आत्माच तुम्हाला शिकवतो.
जेव्हा एखादी कल्पना केवळ मनावर व्यापते, तेव्हा ती प्रत्यक्ष शारीरिक किंवा मानसिक स्थितीमध्ये बदलते.
जग हे एक उत्तम व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला मजबूत बनवतो.
Swami Vivekananda Motivational quotes in Marathi
स्वतःच्या स्वभावाशी खरे असणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. स्वतःवर विश्वास ठेवा.
सामर्थ्य जीवन आहे, दुर्बलता मृत्यू आहे.
विस्तार म्हणजे जीवन, आकुंचन म्हणजे मृत्यू.
प्रेम म्हणजे जीवन, द्वेष म्हणजे मृत्यू.
दिवसातून एकदा स्वतःशी बोला, नाहीतर तुम्ही या जगात एखाद्या बुद्धिमान व्यक्तीला भेटू शकता.
हृदय आणि मेंदू यांच्यातील संघर्षात आपल्या हृदयाचे अनुसरण करा.
तुमच्या जीवनात जोखीम घ्या, तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू शकता !
Swami Vivekananda quotes in Marathi
आपण दुर्बल आहोत असा विचार करणे हे सर्वात मोठे पाप आहे.
आत्म्यासाठी काहीही अशक्य आहे असे कधीही समजू नका.
ज्या धर्माने जगाला सहिष्णुता आणि सार्वत्रिक स्वीकृती शिकवली त्या धर्माचा मला अभिमान आहे. आम्ही केवळ सार्वभौमिक सहिष्णुतेवर विश्वास ठेवत नाही तर आम्ही सर्व धर्मांना सत्य मानतो.
स्वतःवर विजय मिळवा आणि संपूर्ण विश्व तुमचे आहे.
प्रत्येक कामाला उपहास, विरोध आणि नंतर स्वीकार या टप्प्यांतून जावे लागते. जे आपल्या वेळेच्या पुढे विचार करतात त्यांचा गैरसमज होणार हे नक्की.
एकाग्रतेची शक्ती ही ज्ञानाच्या खजिन्याची एकमेव गुरुकिल्ली आहे.
आपण जितके शांत राहू आणि आपल्या मज्जातंतूंना जितके कमी त्रास होईल तितके आपले कार्य अधिक चांगले होईल.
आसक्ती आणि अलिप्तता या दोन्ही गोष्टी उत्तम प्रकारे विकसित झाल्यामुळे माणूस महान आणि आनंदी होतो.
आपल्या विचारांनी आपल्याला जे बनवले आहे ते आपण आहोत; त्यामुळे तुम्हाला काय वाटते याची काळजी घ्या.
आपल्याला गरम करणारी अग्नी आपल्याला भस्मसातही करू शकते; तो आगीचा दोष नाही.
तुमच्या विचाराप्रमाणे जगण्याचे धाडस करा. जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका.
जेव्हा तुम्हाला कोणतीही समस्या येत नाही तेव्हा तुम्ही खात्री बाळगू शकता की तुम्ही चुकीच्या मार्गाने प्रवास करत आहात.
जग एक महान व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला मजबूत बनवण्यासाठी येतो.