राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे हे होते. त्यांचे गुरू आडकोजी महाराज त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव बदलून तुकडोजी असे केले.भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला. महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता.
आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. विदर्भात त्यांचा विशेष प्रचार असला तरी देशभर नव्हे तर जगभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. एवढेच नव्हे तर स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेले लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे.
Tukdoji Maharaj quotes in marathi
अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, बेघरांना घर द्यावं,
रंजल्या – गांजल्याची सेवा करावी,
मुक्या प्राण्यावर
दया करावी…
बापहो देव यांच्यात राहतो बापहो देव
देवळात राहत नाही…
देव आपल्या मनात राहतो…
देवळात फक्त पुजा-याचे पोट राहते !!
एका परमेश्वराशिवाय उगीच नाना देवतांची अनेकत्वाने पूजा करणे म्हणजे आपले प्रेम व्यभिचारी बनवून शुद्ध भावनेचा नाश करणे होय.
ईश्वराची कृपा धन, ऐश्वर्य, संतती इत्यादि असण्यावर अवलंबून नसून ती सद्विचाराच्या वर्तनावरच अवलंबून असते.
Tukdoji Maharaj quotes in marathi
संगीत किंवा भजन आपल्या हृदयेंद्रियाला सुख देऊ शकत नाही आणि दुसऱ्याच्या मदतीवर अवलंबून असते, त्याला खरे संगीत अथवा भजन म्हणता येत नसून, ती एक लोकंना प्रसन्न करण्याची कला आहे.
राष्ट्रदेवतेच्या योग्यतेसमोर लोकांच्या आपापल्या लाखों देवता मला सूर्यासमोर गणल्या जाणाऱ्या काजव्याप्रमाणे वाटतात, पण प्रत्येक देवतेचे महत्व त्यांच्या त्यांच्या स्थानी विशेष असणे हे एक मनुष्याच्या स्वार्थीपणाचेच द्योतक असते.
जे लोक आपत्तीला तोंड देण्याची हिंमत ठेवीत नाहीत, ते भक्ती करुनही मरणाला जिकू शकत नाहीत. जे मरणाला जिंकु शकत नाहीत, ते पुरुष ईश्वराचे भक्त होऊच शकत नाहीत.
मरणास भिऊन रडत बसण्यापेक्षा मरणे अमर कसे होईल याची चिंता करणे बरे असते.
धैर्यहीन मनुष्यांकरिता त्यांची झोपडीही हिमालयाएवढी मोठी व जड होऊन बसते.
मनुष्याने आपल्या सद्विचाराला (विवेकबुद्धीला) व ईश्वराला सदैव भ्याले पाहिजे, परंतु अन्याय आणि दुष्टतेला कधी न भिता हाकून दिले पाहिजे.
प्रसंगी मार खाऊनही आपली सत्यनिष्ठा व धैर्य न सोडणे याला मार देणणाऱ्यापेक्षाही धाडस ठेवावे लागते, म्हणूनच हिसेंपेक्षा अहिंसेची किंमत अधिक मानली जात असते.
Tukdoji Maharaj quotes in marathi
ताकदवान तो नसतो की, जो दुसऱ्याला खाली पाडतो. तोच ताकदवान खरा की, जो पडलेल्याला उचलून नीतिपथावर आणतो.
आपल्या शत्रुविषयीही उत्तम बुद्धी ठेवा त्याने ईश्वराजवळ तुमची कदर होईल.
जे लोक तुम्हांला अलग फेकतात, त्यांच्याशी तुम्ही मिळून वागण्याची बुद्धी ठेवा. जे लोक तुमच्याशी वाईट वागतील, त्यांच्याशी तुम्ही सरळ वागा म्हणजे प्रभू तुमच्याकरिता त्यांना दंड न देता दोस्त करुन घेईल.
आपल्या शत्रूचाही कोणाकडून होत असलेला अयोग्य अपमान सहन करणे वीराचे कार्य नव्हे. शत्रूची अयोग्य फजीती नेत्राने पाहून समाधान मानणे हे नीचाचे काम आहे.
शत्रू आणि मित्र हा भेदभाव कार्यातच समजणे व इतर प्रसंगी दोघांनाही आपल्यासमान पाहणे, हेच शूर लोकांचे लक्षण असते.
आपत्तीच्या जाळीतून करुण हाक ऐकू येत असता प्राणाची पर्वा न करुन धडाडीने मदत करणारे वीरच खरे वीर समजले जात असतात.
मनुष्य गुणाने उत्तम असला म्हणजे कुरुपही रुपवान दिसत असतो.
आपल्याजवळ असलेल्या कोणत्याही वस्तूवर कार्याशिवाय अती प्रेम करणे, म्हणजे उगीच आपली वृत्ती गुलाम करुन शेवटी भुतांच्या हाती प्राण देणेच होय.
कोणत्याही माणसाची प्रेतयात्रा चालली असता निदान पाच पावले तरी त्याच्यामागून चालू लागा व नंतर आपले काम करा ही त्या रथीची इभ्रत आहे.
नदी ज्याप्रमाणे सागराला मिळण्याकरिता उत्सुक असते त्याप्रमाणेच शेवटच्या वेळी जीव हा आपली जबाबदारीची कर्तव्ये परमेश्वरासमोर मांडण्याकरिता उत्सुक असतो (किंवा असायला हवा)
मित्रांनो ! मरणाला आपला अत्यंत प्रिय आणि हितैषी मित्र समजा. जो आपली भेट परमेश्वराशी करुन देण्याला उत्सुक असतो आणि तुच्छ आसक्तीचे बंधन तोडण्यास सुसज्ज असतो.
अपरिग्रह म्हणजे मुद्दाम लंगोटी लावणे नसून, जरुरी आहे त्यातच स्वावलंबी होणे हाच खरा अपरिग्रह आहे.
३८. आत्यंतिक ऐषआराम हे शेवटच्या अवनतीचे असते व आत्यंतिक सावधानी आणि कार्यतत्परता हे ऐश्वर्य प्राप्तीचे लक्षण असते.
आपली सुखसोय दुसऱ्यावर अवलंबून ठेवणे म्हणजे आपले मरण लोकांनी हसत पाहण्याची इच्छा करणेच होय.
मागे पहाल तर आपले दोष पहा आणि पुढे पहाल तर थोरांची चरित्रे पहा म्हणजे उन्नतीचा मार्ग मिळेल.
Tukdoji Maharaj quotes in marathi
मोठ्या गुन्हेगारांपैकी ते लोक असतात, जे आपल्या वडिलांची सत्य आज्ञाही मानीत नसतात आणि मोठ्यांची मने दुखवितात; खोटीच शपथ सदा घेतात नि खोटीच साक्ष लोभास्तव देतात.
मनुष्याचा स्वभाव एखाद्या प्रसंगानेच उघडा पडत असतो.
तेच लोक सज्जन असतात, ज्यांना उत्तम कामाविषयी खुशी आणि वाईट कामाचे दुःख होते.
खरा स्वयंसेवक तोच की, ज्यावर लोक आपली कौटुंबिक मालमत्ता सोपवण्याएवढा भरवसा ठेवू शकतात नि तसे करिताना नि:शंक राहतात.
शस्त्रे घर्षणाने चमकतात आणि शूर संघर्ष प्रसंगानीच चमकत असतो.
धाडसाची तयारी प्रसंगांनीच लौकर वाढत असते, केवळ छाती मोठी करुन नव्हे.
लक्षावधी रुपये देत असताही जो लाचलुचपतीच्या मोहाने आपली न्यायबुद्धी गहाण ठेवून सत्य पक्ष विसरत नाही, तोच पुरुष वीरांच्या मालिकेत बसवण्यास योग्य असतो.
प्रयत्नशील व वीर पुरुषास हा समस्त संसार गुलाबाच्या फुलांच्या ताटव्यासारखा आल्हादकारक सुगंध देणारा वाटत असतो.
लोकांकडून नेहमी सन्मान घेऊ इच्छिणारी माणसे ऐन प्रसंगी अपमानास पात्र होतात. याकरिता आपला उगीच मान व्हावा असे चिंतू नका आणि सर्वाशी समान भावनेने वागा.
देहापेक्षा कर्तव्याचा मान लाखोपटीने उत्तम असतो आणि चिरंतर ही (अमर) असतो.
पुढे सरकाल तर सेवेकरिता आणि मागे हटाल तर मानाकरिता (सन्मानप्रसंगी); असे झाले की लोकमित्र निश्चयाने व्हाल.