संत गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे गाडगे महाराज हे भारतीय महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत समाजसुधारक होते. ते ऐच्छिक दारिद्र्यात राहिले आणि सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विशेषत: स्वच्छतेशी संबंधित विविध सुधारणांना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या खेड्यांमध्ये फिरले.
संत गाडगे बाबांचे विचार समाजाला, समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीला अमूल्य सल्ला, शिकवण देऊन जातात.
भुकेलेल्यांना = अन्न
तहानलेल्यांना = पाणी
उघड्यानागड्यांना = वस्त्र
गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
बेघरांना = आसरा
अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
बेकारांना = रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
दुःखी व निराशांना = हिंमत
गोरगरिबांना = शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे
हुंडा देऊन किंवा घेऊन
लग्न करू नका.
सगळे साधू निघून गेले आहेत
आता उरले आहेत
ते फक्त चपाती चोर (ढोंगी)
Sant Gadge Maharaj quotes in marathi
विद्या शिका आणि
गरिबाले विद्ये साठी
मदत करा.
तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी
माणसाचे खरोखर देव
कोण असतील तर ते
आई बाप.
अडाणी राहू नका, मुला-बाळांना शिकावा.
शिक्षण हे समाज
परिवर्तनाचे साधन आहे.
शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते
आपण ह्या जगात
कशासाठी आलो आहोत हे कळते.
माणसाने माणसाबरोबर
माणसासारखे वागावे
हाच बोध मी ग्रहण केला आहे.
जो वेळेवर जय मिळवतो
तो जगावरही जय मिळवतो.
दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका.
दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा.
दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही.
धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका.
माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप.
शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते
Sant Gadge Maharaj quotes in marathi
माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप.
दिवाळीला हरभरा पीठ खा, जुने कपडे प्रेस करून घाला, फटाके जाळू नका, कर्ज घेऊन कर्जात बुडू नका.
कर्ज देऊन लग्न करू नका, कर्जे घेऊन घर बांधू नका, कर्जे करुन तीर्थयात्रा करू नका.
दया आणि सेवा ही संतांची सर्वात मोठी संपत्ती आहे. हेच धन आपल्याला मिळवायचे आहे आणि जनतेची सेवा करायची आहे.
आपण चांगले कर्म करा, या रत्नांप्रमाणेच संतांच्या विचारांचे अनुसरण करा आणि नारायण व्हा.
अध्यापन हे लोकांच्या सेवेचे साधन आहे. सुशिक्षित लोकांनी जनतेची सेवा करावी.
समाजाच्या प्रगतीसाठी स्वयंरोजगार होणे आवश्यक आहे. त्यांनी शहरापेक्षा गावातच राहायला हवे. गावातील लोकांची समस्या काय आहे हे जाणले पाहिजे आणि ही समस्या सोडविली पाहिजे.