महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. समर्थ रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत आईचे नावराणूबाई होते तर त्याचे जन्म नाव नारायण सूर्याजी ठोसर आहे.
व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात महत्वाचे स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत केली .साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते.
समर्थांनी हनुमंताची अनेक मंदिरे बाधली . हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे त्यामुळे तिची उपासनाकेली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनीलिहिण्याची, वाचण्याची मोहीम काढली.समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङ्मय निर्मिती केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
समर्थांनी साहित्य, कला, आरोग्य, जीवनशैली, निसर्ग, बांधकाम, उद्योग या विषयांवरही लिहिले आहे. जीवनाचे कोणतेही अंग समर्थांनी सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करतात. असे अनेक विषय त्यांच्या साहित्यात आहेत. .पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केले आहे.
Samarth Ramdas Swami quotes in Marathi
उत्तम गुण तितुके घ्यावे !घेऊन जनास शिकवावे !उदंड समुदाय करावे !परी गुप्तरूपें !!
वाट पुसल्याविण जाउ नये। फळ ओळखल्याविण खाऊ नये॥ पडिली वस्तु घेऊ नये। येकायेकी॥
विचारेविण बोलो नये। विवंचनेविण चालो नये॥ मर्यादेविण हालो नये। काही येक॥
प्रीतीविण रुसो नये। चोरास वोळखी पुसो नये॥ रात्री पंथ क्रमु नये। येकायेकी॥
जनी आर्जव तोडु नये। पापद्रव्य जोडू नये॥ पुण्यमार्ग सोडू नये। कदाकाळी॥
वक्तयास खोदु नये। ऐक्यतेशी फोडू नये॥ विद्या-अभ्यास सोडू नये। काही केल्या॥
तोंडाळासी भांडो नये। वाचाळासी तंडो नये॥ संतसंग खंडु नये। अंतर्यामी॥
Samarth Ramdas Swami quotes in Marathi
अति क्रोध करु नये। जिवलगांस खेदु नये॥ मनी वीट मानु नये। शिकवणेचा॥
क्षणाक्षणा रुसो नये। लटिका पुरुषार्थ बोलो नये॥ केल्याविण सांगो नये। आपुला पराक्रमु॥
आळसे सुख मानू नये। चाहाडी मनास आणू नये॥ शोधल्याविण करू नये। कार्य काही॥
सुखा आंग देऊ नये। प्रेत्न पुरुषे सांडू नये॥ कष्ट करि त्रासो नये। निरंतर॥
कोणाचा उपकार घेउ नये। घेतला तरी राखो नये॥ परपीडा करु नये। विश्वासघात॥
शोच्येविण असो नये। मळिण वस्त्र नेसो नये॥ जाणारास पसो नये। कोठे जातोस म्हणऊनी॥
सत्यमार्ग सांडू नये। असत्य पंथे जाउ नये॥ कदा अभिमान घेउ नये। असत्याचा॥
अपकीर्ती ते सांडावी। सत्कीर्ती वाढवावी॥ विवेके दृढ धरावी। वाट सत्याची॥