बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. गौतम बुद्ध, शाक्यमूनी बुद्ध, सिद्धार्थ गौतम, सम्यक सम्मासंबुद्ध ही त्यांची अन्य नावे आहेत.शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी क्षत्रिय कुळामध्ये इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी येथे बुद्धाचा जन्म झाला.या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ (पाली भाषेत सिदत्थ गोतम) असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. इ.स.पू. ५४७ मध्ये यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला.
जगाला दु:ख, जन्म आणि मृत्यू यांपासून मुक्त करण्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला.भगवान बुद्ध हे महान आध्यात्मिक गुरुंपैकी एक होते. शांती, बंधुता आणि करुणेचा शाश्वत संदेश भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला दिला.यांच्या शिकवणी, संदेश आणि विचार मानवाला नैतिक मूल्ये आणि समाधानावर आधारित जीवन जगण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देतात. भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला करुणा आणि सहिष्णुतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. वैशाख-बुद्ध पौर्णिमा हा गौतम बुद्धांचा जन्म, बुद्धत्वाची प्राप्ती आणि महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते.
Gautama Buddha quotes in marathi
मन शांत केल्यावर सर्व समस्यांचे समाधान सापडते.
ज्याने आपल्या मनाला नियंत्रणात केले, त्याच्या विजयाला परमेश्वर देखील अपयशात बदलू शकत नाही.
सर्व वाईट कार्य मनामुळेच होतात. जर मन परिवर्तित झाले तर वाईट कार्य देखील थांबतील.
एक निष्ठाहिन आणि वाईट मित्र जंगली प्राण्यापेक्षा जास्त भयानक असतो; कारण एक जंगली प्राणी फक्त शरीराला घाव देतो परंतु एक वाईट मित्र तुमच्या मनाला आणि बुद्धीला घाव घालतो.
चातुर्याने जगणार्या लोकांना मृत्यूलाही घाबरण्याची आवश्यकता नाही.
द्वेष हा द्वेष केल्याने कमी होत नाही, परंतु प्रेम केल्याने नक्कीच कमी होतो. आणि हेच शाश्वत सत्य आहे.
ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण प्रवास व्यवस्थित करणे आहे.
तुम्हास आपल्या क्रोधासाठी दंड मिळणार नाही तर तुमचा क्रोधच तुम्हाला दंड देईल.
हजारो शब्दांपेक्षा तो एक शब्द चांगला आहे जो शांती निर्माण करतो.
पाण्याचा जग हा थेंब थेंब पाण्यानेच भरतो.
भूतकाळाकडे लक्ष देऊ नका, भविष्याचा विचार करू नका, आजच्या वर्तमानात चित्त केंद्रित करा.
आरोग्य ही सर्वात मोठे बक्षीस आहे, संतोष सर्वात मोठे धन आहे आणि प्रामाणिकता सर्वात मोठा संबंध आहे.
Gautama Buddha quotes in marathi
ज्या पद्धतीने मेणबत्ती आगीशिवाय जळत नाही, त्याच पद्धतीने मनुष्य अध्यात्मिक जीवनाशिवाय जगू शकत नाही.
तीन गोष्टी जास्त वेळ लपून राहत नाहीत. सूर्य, चंद्र आणि सत्य.
आपल्या मोक्षप्राप्तीसाठी स्वतः प्रयत्न करा दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.
ज्ञान ध्यानाद्वारे उत्पन्न होते. आणि ध्यानाशिवाय ज्ञान हरवून जाते.
धबधबा खूप आवाज करतो. समुद्र शांत आणि खोल असतो.
स्वर्गाचा मार्ग आकाशात नव्हे तर आपल्या ह्रदयात आहे.
वाईट गोष्टींपासून दूर राहण्याकरिता आपल्यामध्ये चांगल्या गोष्टींचा विकास करा आणि आपले मन सकारात्मक गोष्टींनी भरा.
वाईट गोष्टींपासून दूर राहण्याकरिता आपल्यामध्ये चांगल्या गोष्टींचा विकास करा आणि आपले मन सकारात्मक गोष्टींनी भरा.
अज्ञानी मनुष्य एका बैलाप्रमाने आहे जो ज्ञानाने नव्हे तर फक्त शरीराने वाढतो.
अज्ञानी लोकांनी सांगितलेल्या मार्गावर चालल्याने जीवन व्यर्थ होते.
या जगात सत्य शिवाय सर्वांचा अंत होणे ठरलेले आहे.
मनुष्य हा जन्माने नव्हे तर कर्माने शूद्र आणि ब्राह्मण असतो.
मनुष्य हा जन्माने नव्हे तर कर्माने शूद्र आणि ब्राह्मण असतो.
आनंदाचा कोणताही मार्ग नाही, नेहमी आनंदी राहणे हाच एकमेव मार्ग आहे.
शांती ही व्यक्तीच्या आत असते तिला बाहेर शोधण्याचा प्रयत्न करू नका.
आकाशात पूर्व आणि पश्चिम मध्ये काहीही भेदभाव नाही. लोक स्वतः आपल्या मनात भेदभाव निर्माण करतात आणि हेच सत्य आहे असे समजू लागतात.
जीवनात सर्वात मोठी विफलता असत्यवादी असणे ही आहे.
अर्थहीन वाद-विवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते.
Gautama Buddha quotes in marathi
तुमच्या रागामुळे तुम्हाला शिक्षा होणार नाही, तुमच्या रागाने तुम्हाला शिक्षा होईल.
जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाही, सूर्य, चंद्र आणि सत्य.
शांतता नेहमी मनातूनच येत असते, त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही
भूतकाळावर लक्ष न देता भविष्याविषयी विचार करा, आणि स्वतःच्या मनाला वर्तमानात
खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती कधीच कोणालाही दुखवू शकत नाही.
मन सर्वकाही आहे, तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनता.
तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही, त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात.
सुख मिळवायचा असा कोणताच रस्ता नाही आहे, त्यापेक्षा खुश राहणे हाच एक रस्ता आहे.
तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला जास्त बिलगता किंवा चिटकून राहता.
आपल्या वयावर आणि पैश्यांवर कधीच घमंड करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या एक ना एक दिवस संपतातच.
राग कवटाळून धरणे म्हणजे हे स्वतः विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासमान असते.
सगळ्यात काळी रात्र म्हणजे अज्ञानता.
सर्वच समजून घेणे म्हणजे सर्व माफ करणे होय.
प्रत्येक मनुष्य हा स्वतःच्या आजारांचा निर्माता आहे.