संत एकनाथ महाराष्ट्तील वारकरी संप्रदायातले एक संत होते. संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते तर आईचे नाव रुक्मिणी होते. गिरिजाबाई हे त्याच्या पत्नीचे नाव असून त्यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. सद्यपरिस्थितीत योगिराज महाराज गोसावी पैठणकर हे नाथांचे १४ वे वंशज म्हणून ओळखले जातात.
एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले असे म्हणतात. दत्तात्रेय द्वारपाल म्हणून नाथांच्या द्वारी उभे असत असेही म्हणतात. एवढेच नाही तर दत्ताची (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) ही आरती त्यांनीच रचलेली आहे.
एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. रुक्मिणीस्वयंवर हे काव्य ही त्यांनींच लिहिले आहे. नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. तसेच जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे.
Sant Eknath Maharaj quotes in marathi
आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे
भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगच नाडावे
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
Sant Eknath Maharaj quotes in marathi
परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा
एका जनार्दनी ह्मणे हरी हा गुप्तची ओळखावा
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना