प्रेम ही एक सुंदर भावना आहे. जेव्हा तुमचं कुणावर निखळ प्रेम असेल तेव्हाच तुम्हाला ते जाणवू शकतं. परंतु प्रेमात पडलेली व्यक्ती मग ती मुलगा असो वा मुलगी, आपल्या भावना पुरेशा प्रमाणात व्यक्त करू शकत नाही, असे अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. तो नेहमी एक मार्ग शोधत असतो ज्याद्वारे तो आपल्या प्रियकराला त्याचे प्रेम दाखवू शकेल.
तर माझ्या प्रिय मित्रांनो, आज आम्ही ही उत्तम पोस्ट घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या भावना मराठीत व्यक्त करणारे सर्व प्रकारचे कोट्स सापडतील. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे नाते आनंदी आणि सुंदर बनवू शकता. त्यामुळे आत्ताच वाचायला सुरुवात करा आणि प्रेमाची खोल भावना अनुभवा. हे सुंदर प्रेम कोट्स वापरून आपल्या प्रियकराला सांगा की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता.
या हातांच्या रेषांमध्ये विशेष काही नाही,
पण तु असेल तर एक ओळ पुरेशी आहे.
ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.
ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.
त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.
आणि ती तूच काय, ज्यात मी नाही.
हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहेत,
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे.
आयुष्यभर साथ देणारी,
माझी सावली आहेस तु,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु,
हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं,
ते मागणं आहेस तु.
एखादया व्यक्तीवर
काही काळ प्रेम करणे हे केवळ
आकर्षण असतं पण,
एकाच व्यक्तीबद्दल कायमच
मरेपर्यंत आकर्षण असणे
हे खरं प्रेम असतं.
Love Quotes in Marathi
प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही.
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.
तुझ्यासाठी जीव देणारे तुला
खूप भेटतील
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार…
तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण
भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.
प्रत्येकाच्या मनात कोणालाही
न सांगितलेली प्रेम कहाणी असते.
तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.
जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की, तोडणे अवघड होईल.
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं
Love Status, and Quotes in Marathi
ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
की मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.
मला तुझी तितकीच गरज आहे,
जितकी हृदयाला ठोक्यांची.
ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,
ते परत तुमच्याकडे येते,
पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,
ते आपल्याला कधीच सोडून जात नाही.
समोरची व्यक्ती आपली होणार नाही,
हे आपल्याला माहित असतांनाही,
तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करणं.
म्हणजे खरं प्रेम.
खरं प्रेम करणारा रागात
काहीतरी चुकीचं बोलू शकतो.
पण तुमचं वाईट व्हावं,
याचा विचारही तो करू शकत नाही.
आयुष्य कितीही कठीण असू दे मला फरक पडणार नाही फक्त तू सोबत असायला हवी.
नको मला असे प्रेम ज्यात चार दिवसाचे सोबती असू वचन दे मला की आपण जन्मोजन्माचे सोबती होऊ.
जुन्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात करू त्यात अजून प्रेमाचे रंग भरू.
कधी आठवणीत नको शोधू मला कारण जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा मी प्रत्येक क्षणी तुला सोबत दिसेल.
प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो.