


Holi Information in Marathi
Holi banner in Marathi : हिंदू संस्कृतीत विविध सण साजरे केले जातात. हे सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगवेगळी आहे. पण त्यामागील उद्देश एकच असतो. सण हे केवळ आनंदी, उत्साही होण्याकरता साजरे केले जात नाहीत तर त्यामागे काहीतरी अर्थपूर्ण विचार आणि विज्ञान देखील असते. अगदी उद्यावर आलेल्या होळीचे आणि पंचमीचे देखील फार महत्व आहे.
फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणारा हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे जणू स्वागतच करत असतो. या काळात हिवाळा हा ऋतू नुकताच संपलेला असतो, अन उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते. यावेळी शरीर देखील या निसर्गाच्या बदलाला स्वीकारायला तयार होत असते. तेव्हा शरीराला उर्जा आणि चैतन्याची गरज भासते. ही गरज होळी आणि रंगपंचमी या सणा द्वारे पूर्ण होते. ती कशी ते आता आपण पाहुया.
होळी हा सण संपूर्ण भारतभर आपआपपल्या पद्धतीने मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी पेटलेल्या होळीभोवती प्रदक्षिणा घालण्याची तसेच होळीला नारळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. तसेच दुसऱ्या दिवशी धूलिवंदन म्हणजे रंग पंचमीचा सण साजरा करतात. होळीची रक्षा ,गुलाल एकमेकांना लावून पंचमीचा सण साजरा करण्याची पध्दत आहे.
अशा प्रकारे होळीच्या अग्नीतून आपल्याला उर्जा मिळते अन सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना रंग लावलयामुळे एकतेचे आणि आनंदाचे चैतन्य निर्माण होते.
तसेच भारत हा कृषिप्रधान देश आहे त्यामुळे हाती आलेल्या पिकाबद्दल होळीच्या दिवशी अग्नी देवतेला नैवेद्य समर्पित करण्याच्या प्रथेतून कृतज्ञता देखील व्यक्त केली जाते.
Why होळी is Celebrated?
भारतातील प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही कारण, तर आहेच पण त्या मागचा अर्थपूर्ण इतिहास आणि पैराणिक कथा देखील आपल्या विसरता येणार नाहीत. होळी हा सण साजरा करण्यामागे देखील एक कथा सांगितले जाते. ती म्हणजे भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप यांची कथा होय.
प्राचीन काळात हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता, जो स्वतःला खूपच श्रेष्ठ समजत असे. त्याला देवीदेवतांविषयी खूपच, तिरस्कार होता. त्याच्या राज्यात कोणी देवाचे नाव जरी उच्चारले तरी त्याला सहन होत नसे तो त्याला भयानक शिक्षा देत असे.
पुढे हिरण्यकश्यपला एक मुलगा झाला, त्याचे नाव प्रल्हाद. तो भगवान विष्णूचा मोठा भक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र भगवान विष्णूच्या नामाचे स्मरण करत असे.ही गोष्ट हिरण्यकश्यपला अजिबात पटत नसे. प्रल्हादाची भगवान विष्णूच्या नामस्मरणाची सवय सुटावी यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. मात्र प्रत्येकवेळी त्याला अपयश आले. शेवटी वैतागून हिरण्यकश्यपने प्रल्हादाचा वध करण्याची योजना आखली.
हिरण्यकश्यपची बहिण जिचे नाव होलिका होते, या होलीकेला अग्नी देवा कडून न जळण्याचा आशीर्वाद मिळालेला होता. तेव्हा हिरण्यकश्यपने होलिकेला स्वतःच्या मांडीवर प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसावे. असा आदेश दिला जेणेकरून जळत्या अग्निचीतेवर प्रल्हाद भस्म होईल. होलिका अग्नीच्या चितेवर प्रल्हादाला घेऊन बसली. प्रल्हाद भगवान विष्णूच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाला.
भक्त प्रल्हादाला या अग्नीने कोणतीही इजा झाली नाही. मात्र होलिका या अग्निचीतेवर जळून भस्म झाली. भगवान विष्णूने भक्त प्रल्हादाचे अग्नीपासून संरक्षण केले होते. त्यादिवशी पासून होळी हा सण साजरा केला जातो, अशी मान्यता आहे.
या कथेतून हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ज्याप्रमाणे वाईट प्रवृत्तीची होलिका अग्नीमध्ये जळून नष्ट झाली त्याचप्रमाणे आपण आपले वाईट विचार, अहंकार, वाईट गोष्टी यांचा त्याग करून आपले जीवन आनंदाने आणि समाधानी राहून जगावे.
Download Holi banner Marathi



होळीत आपल्या सर्वाचे दु:ख,
नकारात्मक विचार जळून जावोत,
आणि रंगपंचामीचे सर्व रंग आपल्या
जीवनात आनंद घेऊन येवोत.
रंगपंचामीच्या रंगांनी आपले जीवन
आनंदाने रंगीबेरंगी होवो अन होळीच्या
ज्वाळेत आपल्या जीवनातील नकारात्मकता नष्ट होवो.



रंगबिरंगी रंगाचा सण हा आला वसंत पंचमीचा,
करू साजरा आनंदाने, विसरून सारे मतभेद.



२०२३च्या वसंतपंचामीचा रंग तुमच्या जीवनात
आनंद, उल्हास, आरोग्य अणि शांति घेऊन येवो
आणि होळीच्या पवित्र अग्निमध्ये तुमच्या जीवनातील
निराशा, दारिद्र्य, दु:ख ,मतभेद ,आळस यांचे दहन होवो.