जर तुम्ही या पोस्टवर असाल तर साहजिकच तुमच्या धाकट्या किंवा मोठ्या बहिणीचा आज वाढदिवस आहे. बहिणीच्या वाढदिवशी काय लिहावं असा द्विधा मनस्ताप झाला तर? लहान बहिणीला तिच्या वाढदिवशी अभिनंदन कसे करावे? किंवा मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्याव्यात? त्यामुळे तुमचे काम सोपे करण्यासाठी आम्ही मराठी मध्ये बहिणी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आणल्या आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. कुणी बरोबरच म्हटलंय, देवाची उणीव भरून काढण्यासाठी आई असते आणि आईची उणीव भरून काढण्यासाठी देवाने बहिणीचं नातं निर्माण केलं. बहिणीचे नातेही वेगळे असते, कधी भांडण तर कधी प्रेम. पण आईच्या पश्चात एकच बहीण आहे जी नेहमी सुख-दुःखात आपल्या पाठीशी उभी असते. त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन हा खास दिवस आणखी अविस्मरणीय बनवा.
Birthday Wishes for Sister in marathi
हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू फक्त माझी बहीणच नाही तर एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस… तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे.
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी.
बहिणी पेक्षा चांगला मित्र कोणी नाही आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी बाबांना नाव सांगणारी पण वेळ आल्यावर नेहमी आपल्या पाठीशी उभी राहणारी बहिणच असते. अशा क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी आणि मजेदार लहान बहीण,
तुझ्याशिवाय मी आयुष्यात वेडेपणाने वागले असते,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या गोंडस फुलं वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी… ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
जगातील सर्वात प्रेमळ, गोड, सुंदर आणि
सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी
प्रत्येक क्षणी भांडणारी, बाबांना सतत नाव सांगणारी, वेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी.. अशा माझ्या क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes for Sister in marathi
आयुष्याच्या वाटेवर तुझ्या सर्व स्वप्नांना बहर येऊ दे, तुझ्या प्रयत्न आणि आशा आकांशांना भरभरून यश मिळू दे, परमेश्वराजवळ एकच इच्छा माझ्या ताईला उदंड आयुष्य लाभू दे… ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
हॅपी बर्थडे ताई
रडवते पण, हसवते पण,
उठवते पण, झोपवते पण,
आई नसून पण,
काळजी करते जशी माझी आई
जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा ताई!
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
तू केवळ माझी बहीणच नाहीस तर एक चांगली मैत्रीण आहेस,
तुझ्यासारखी बहिण माझ्याकडे असण्याचा मला अभिमान आहे !
हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे !
Birthday Wishes for Sister in marathi
बाबांची परी ती अन्
सावली जणू ती आईची
कधी प्रेमळ कधी रागीट
ही कविता आहे माझ्या ताईची
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
फूलों का तारों का सबका कहना है,
एक हजारों में मेरी बहना है।
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस, बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
सूर्य प्रकाश घेऊन आला
आणि चिमन्यां गाणे गायल्या
फुलांनी हसून तुम्हाला
वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या
हॅप्पी बर्थडे ताई
तुझ्यासारख्या सुंदर बहिणीची किंमत सोन्याने आणि हिऱ्यांनी भरलेल्या महासागरापेक्षा जास्त आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
बहीण नेहमीच आसपास नसते, पण जेव्हा ती जवळ असते तेव्हा गोष्ट वेगळी असते. वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई
बहीण ही जगातील सर्वात चांगली मैत्रीण आहे. माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या गोड, चुलबुली आणि मस्तीखोर बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्यासारखी लाडकी बहीण सूर्यप्रकाशाच्या सुंदर किरणांसारखी आहे.
माझ्या प्रिय बहिणी, तुझ्या विशेष दिवशी मी तुला आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो.
तुझा भाऊ असणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि मला याचा दररोज अभिमान वाटतो.