प्रेमात पडणे ही एक अनोखी भावना आहे. त्यातून अशा अनेक भावना येतात ज्या आपण व्यक्तही करू शकत नाही. अशा परिस्थितीत प्रियकर आपल्या भावना व्यक्त करताना आणखी वाईट असतात. तुम्ही तुमच्या प्रेयसीवर तुमच्या मनापासून प्रेम करत असाल तरीही, तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला तुमच्या भावना व्यक्त करू शकत नसाल तर तुम्ही प्रियसीला ला चांगले वाटू शकणार नाही. तुमचे काम सोपे करण्यासाठी, आम्ही मराठीमध्ये मैत्रिणीसाठी काही गोड, भावनिक, मजेदार आणि रोमँटिक वाढदिवसाच्या शुभेच्छा आणल्या आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता आणि तुमच्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.
Birthday wishes for girlfriend in marathi
परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा…
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.
कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
जे जे हव ते तुला मिळू दे, तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे, तूझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे. देवाकडे फक्त एकच मागण आहे तुझ्या वाढदिवसादिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..
Birthday wishes for girlfriend in marathi
कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला
प्रिये, मी तुला तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी वचन देतो की तुला आनंद ठेवण्यासाठी मी सर्वकाही करेन.
तू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास, माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस. माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही. तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस.
मला तुझ्या हृदयात जागा दिल्याबद्दल आणि तुझ्या आयुष्याचा भाग बनवल्याबद्दल मी तुझी/तुझा खूप आभारी आहे.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
जगातील सर्वोत्तम मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्यावर कायम प्रेम!
वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिये ! तू माझ्या कडू आयुष्याची गोड चेरी आहेस!
माझ्या हसण्याचे कारण तू आहेस, माझ्या प्रेमाचा आणि आनंदाचा स्रोत आहेस. माझ्या प्रिये , वाढदिवसाच्या शुभेच्छा.
सुंदर आणि सोज्वळ. ज्या मैत्रिणीवर मी खूप प्रेम करतो तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा.